मोर आणि कावळा...

                                        मोर आणि कावळा 
कावळा आणि मोर

एकदा एका जंगलात एक मोर राहत होता. त्याला त्याच्या बारीक आणि सुंदर पंखाचा खूप अभिमान होता. एके

 दिवशी त्याला एक कावळा भेटला. मोर कावळ्याला म्हणाला, "तुझे पिसे किती निस्तेज आणि काळे आहेत!" पण

 कावळा काहीच म्हणाला नाही. मोर म्हणाला, "माझ्या सुंदर पिसांकडे बघ". खूप सुंदर आणि रंगीबेरंगी आहेत.

मोर कावळा
असे म्हणून मोर आनंदाने पंख पसरून नाचू लागला. कावळा तेव्हा ही काहीच बोलला नाही. शांत राहीला.

 तेवढ्यात, एक शिकारी त्या वाटेने आला. शिकाऱ्याला पाहताच कावळा उडून गेला. पण मोराला उडता येत नव्हते.

 शिकाऱ्याने मोराला पकडले आणि घेऊन गेला. 

कावळा आणि मोर

तात्पर्य : निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये दिली आहेत. कुणाचा रंग काळा असतो तर कुणाचा पांढरा. त्यामुळे कधीही कुणाच्या रंग रुपावरून चेष्टा करू नये. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post