माकडा ची फजिती
एका जंगलात काही सुतार काम करीत होते. ते एका मोठ्या लाकडाचा ओकांडा चिरत होते. थोड्या वेळाने दुपार
झाली.ओकांडा अर्धे चिरायचे राहिले होते. त्यात त्यांनी पाचर ठोकली व ते जेवायला गेले. तेवढ्यात तिथे काही
माकडे आली. ती माकडे इकडे-तिकडे उड्या मारू लागली. त्यातले एक माकड त्या ओकांडावर बसले. ते
पाचरीशी खेळू लागले. हळूहळू पाचर सैल होऊ लागली. माकडाने ती पाचर काढली. पाचर काढल्याबरोबर त्या
माकडाची शेपटी त्या फटीत अडकली. माकड जोरजोराने ओरडू लागले. सुतारांनी माकडाचा आवाज ऐकताच
तिथे आले. त्यांनी पुन्हा त्या लाकडात पाचर ठोकली व माकडाची शेपटी बाहेर काढली. माकड ओरडत पळालं.
सुतार मात्र खो-खो हसू लागले.
तात्पर्य : ज्या वास्तूची आपल्याला माहिती नाही, त्या वस्तूला आपण हात लावू नये, व तिच्याशी खेळू नये. नाहीतर माकडाप्रमाणे फजिती होईल.